Increase Size Normal Size Decrease Size
Annasaheb Patil Arthik Magas Vikas Mahamandal Maryadit
महामंडळाच्या तीन योजनांची प्रत्यक्ष ऑनलाईन अंमलबजावणी/ अर्ज करणे प्रक्रिया ही २ फेब्रुवारी २०१८ पासून सुरु होईल, याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी. शासन निर्णय दि. २१/११/२०१७ व मार्गदर्शक सूचना या माहितीसाठी ऑनलाईन उपलब्ध आहेत | बीज भांडवल कर्ज योजने करिता अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३० नोव्हेंबर २०१७ रात्री ११.५९ पर्यंत होता. (Notification Dt.21/11/2017) | महामंडळाच्या नवीन तीन योजनांचा लाभ घेण्यासाठी https://udyog.mahaswayam.in या वेब प्रणालीचा वापर करावा. | मला ऑनलाईन अर्ज भरण्यास मदत हवी (येथे क्लिक करा) |    ५ पेक्षा अधिक वेळेस चुकीचा पासवर्ड आपण टाकल्यास, “पासवर्ड विसरलात” या पर्यायाचा वापर करा |    दस्तावेजांची मर्यादा १० MB पर्यंत वाढविण्यात आली आहे

बातम्या आणि घोषणा

बीज भांडवल कर्ज योजना
गट प्रकल्प योजना

उमेदवारांसाठी उपलब्ध सुविधा

नवीन घोषणा
वेबसाइट प्रचार
----***************----
नवी भरती
English
    1)Job Description
    2)Application Form
    3)Required Company Secretory
    4)Required-Chartered Accountant Firms/Companies
मराठी
    1)कामाचे वर्णन
    2)नोकरी अर्ज
    3)पाहिजेत कंपनी सेक्रेटरी
    4)पाहिजेत- चार्टर्ड अकांउटंट फर्म्स/ संस्था
----***************----
वार्षिक लक्ष्य २०१४-१५
वार्षिक लक्ष्य २०१५-१६
नवीन वार्षिक लक्ष्यांक २०१६-१७
----***************---- REQUIRED- CHARTERED ACCOUNTANT FIRM (ADV. 25/08/2016)
----***************----

लॉगीन करा

नोंदणी

उमेदवार एन.जी.ओ.

अभ्यागत काउंटर

1953202

महाराष्ट्र राज्य रोजगार आणि स्वयंरोजगार धोरण

महाराष्ट्र राज्याने सन २००० मध्ये रोजगार आणि स्वयंरोजगारा बाबत घोषित केलेल्या धोरणानुसार सुशिक्षित बेरोजगारांना स्वयंरोजगार योजनाप्रीत्यर्थ आवश्यक तो निधी देण्याची जबाबदारी राज्य शासनाने उचलली आहे. स्वयंरोजगार योजनांची उद्दिष्टे व त्यांची यशस्वीता योग्य लाभार्थीच्या निवडीवर अवलंबून आहे. रोजगार व स्वयंरोजगार योजनांची उद्दिष्टे ही केवळ इष्टांकपुर्ती साठीच न राहता या योजनामुळे योग्य लाभार्थ्याला खरोखरच लाभ होण्यासाठी या योजना सुलभ आणि पारदर्शीपणे राबवणे आवश्यक आहे. स्वयंरोजगारासाठी सामान्यपणे कोणतीही व्यक्ती सहसा प्रवृत्त होत नाही, कारण त्याव्यक्तीस भविष्यात आर्थिक स्थैर्य प्राप्त होण्याची खात्री वाटत नाही. स्वयरोजगाराकरिता समाजात अनुकूल बदल घडवून आणावयाचे असतील तर स्वयरोजगार करणाऱ्यास त्याचे भविष्यकाळासाठी आर्थिक स्थैर्याची शाश्वती मिळवून देण्याची आवश्यकता आहे.
या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने राज्यातील बेरोजगार उमेदवारांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करण्याच्या दृष्टिने महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत असलेल्या महामंडळामार्फत स्वयंरोजगार इच्छुक उमेदवारांना स्वयंरोजगाराकरीता प्रोत्साहन तसेच, कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते.
राज्यातील बेरोजगारीची तिव्रता कमी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने विविध प्रकारच्या स्वयंरोजगार योजना सुरु केल्या आहेत. या अनुषंगाने स्वयंरोजगाराच्या कर्ज योजनांची पारदर्शी आणि प्रभावी अंमलबजावणी होऊन उमेदवारांना स्वयंरोजगाराकरीता कर्ज उपलब्ध करुन देणे सुलभ व जलद होण्याकरीता स्वयंरोजगार वेबपोर्टल विकसित करण्यात आले आहे.

उमेदवारांसाठी उपलब्ध सुविधा

या वेबपोर्टल वर स्वयंरोजगार इच्छुक उमेदवारांकरीता उपलब्ध सुविधा

  • विविध प्रवर्गातील उमेदवारांकरीता महामंडळाच्या योजना
  • उमेदवारास पात्रतेनुसार सुयोग्य स्वयंरोजगार योजनेचा शोध घेणे
  • उमेदवारांना स्वयंरोजगार कर्ज अर्ज ऑन लाईन भरणे
  • कर्ज योजनेसाठी आवश्यक पात्रता, अटी व शर्ती, कर्ज मंजुर होण्यापूर्वी तसेच, कर्ज मंजुर झाल्यानंतर सादर करावयाच्या कागदपत्रे इत्यादी माहिती उपलब्ध
  • ऑन लाईन सादर केलेल्या अर्जाची सद्यःस्थिती तपासणे, कर्ज परतफेडीची सद्यस्थिती पाहणे
  • २५० पेक्षा अधिक नमुना प्रकल्प अहवालांची वेबपोर्टलवर उपलब्धता
  • कर्जफेडीच्या हप्त्यांची परिगणना (इएमआय कॅलक्युलेटर) करणे
  • उमेदवारांच्या अडचणी निराकरणासाठी हेल्पलाईन